Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुदत संपल्यानंतर सदस्य अपात्रतेचा निर्णयाने जावळीत खळबळ

सातारा / प्रतिनिधी : म्हसवे, ता. जावळी येथील ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा न करता थकबाकीदार असल्याने सभापती पद भूषविले. त्याची मुदत संपल्यानंतर सदस

मोदी सरकारकडून जनतेची पिळवणूक : आ. पृथ्वीराज चव्हाण
दांडेघर येथील डोंगराला मोठ-मोठ्या भेगा; शाळेच्या इमारतीला धोका
स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप

सातारा / प्रतिनिधी : म्हसवे, ता. जावळी येथील ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा न करता थकबाकीदार असल्याने सभापती पद भूषविले. त्याची मुदत संपल्यानंतर सदस्यत्व अपात्र केल्याचा निर्णय देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. वराती मागून दिवा बत्तीवाला अशी चर्चा सुरू झाली आहे. कोरोना संसर्गामुळे निर्णय देण्यात विलंब होत असल्याचेही नमूद केले आहे.
जावळी तालुक्यातील म्हसवे गणातून सन 2017 मध्ये सौ. अरुणा शिर्के निवडून येऊन जावळी पंचायत समितीच्या सभापती झाल्या. त्यांच्या निवडीला गावातील कृष्णा शिर्के यांनी लेखी तक्रार करून आव्हान दिले होते. या कालावधीत सातारा जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन दाद मागितली होती. सातारा जिल्हाधिकारी यांनी सन 2019 मध्ये सदस्य पद अपात्र ठरविले होते. त्यांचा तो अधिकार नाही या सबबी खाली निर्णयाला स्थगिती देऊन पुन्हा विभागीय आयुक्त, पुणे यांनी सौ. अरुणा शिर्के यांना अपात्र असल्याचा निकाल जाहीर केला. तोपर्यंत सौ. शिर्के यांच्या पदाचा कार्यकाल संपला होता.
तक्रारदार यांच्या वतीने अ‍ॅड. गणेश जाधव यांनी सक्षमपणे बाजू मांडली. तो युक्तिवाद ऐकून अखेर सौ. अरुणा शिर्के यांना अपात्र ठरविण्याचा निकाल दिला. निकालाने पात्र असलेल्या जावळीतील इतर महिला सदस्य सभापती होऊ शकल्या नाहीत. याची सखोल चौकशी करून विलंब लावणार्‍या शासकीय दोषी अधिकार्‍यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद करून त्यांच्यावर कारवाई झाली तरच लोकशाही टिकेल अन्यथा अशाच अपात्र लोकांना सत्तेची संधी मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS