जिल्हा परिषद नांदेडचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी स

जिल्हा परिषद नांदेडचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बाबुराव पुजरवाड यांनी महेश पाटील यांना शुभेच्छा देत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांची व सदस्यांची ओळख करून दिली. जिल्हा परिषद प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्माण करून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा शाखा अध्यक्ष धनंजय गुम्मलवार, सचिव राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष सचिन चौदंते यांच्यासह बालाजी महाजन, संतोष मठपती, पवन तलवारे, रणजीत गजभारे, अभय नलावडे, अशोक मोकले, शुभम तेलेवार, खाजा मोहीयोद्दीन, किशोर जाधव, दीपक महालिंगे, उमाकांत हाळे, गणेश आंबेकर, विजय वाघमारे, प्रदीप परोडवाड, लक्ष्मीकांत मोटरवार, शिवसांब चेडू तसेच महिला पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभात उपस्थित कर्मचार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत जिल्हा परिषदेच्या प्रशासनात पारदर्शकता, कर्मचारी हित आणि विकासाभिमुख कामकाजाला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS