Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरेंन-आरुष यांची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भोपाल येथे पार पडलेल्या 755 ओपन इंडिया स्पर्धेमध्ये परफेक्ट एक्स शॉट रायफल शूटिंग रेंजचा अथलिट कु. विरेन राहुल गिरिगोसा

बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई
इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी
विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भोपाल येथे पार पडलेल्या 755 ओपन इंडिया स्पर्धेमध्ये परफेक्ट एक्स शॉट रायफल शूटिंग रेंजचा अथलिट कु. विरेन राहुल गिरिगोसावी याने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल जूनियर पुरुष व्यक्तीगतमध्ये 284 स्कोअर करत रौप्य पदक तर युथ प्रकारात ब्राँझ पदक पटकावले.
कु. आरुष योगेश गोंदकर याने 276 स्कोअर करत अनुक्रमे 7 वा व 8 वा क्रमांक पटकावला. दोघांची दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना रायफल शूटिंग प्रशिक्षक नईम मुबारक नरदेकर व सांगली जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत अंदलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS