Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी

राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात हमरी-तुमरीइस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय क

गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पकडण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले
नवर्‍याला पुराव्याशिवाय स्त्री लंपट, दारुडा म्हणणे क्रुरता – मुंबई उच्च न्यायालय

राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात हमरी-तुमरी
इस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात मुख्याधिकारी यांच्या दालनात हमरी-तुमरी चा प्रकार घडला. एकमेकांना शिव्या घालत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एकमेकांना शिवीगाळ करताना चढलेला आवाज ऐकून नगरपालिका आवारातील नागरिकांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात गर्दी करत या दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.
संजय कोरे हे केली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत असून पिरअली पुणेकर हे माजी नगरसेवक आहेत. पुणेकर यांच्या पत्नी गेली पाच वर्षे नगरसेविका होत्या. संजय कोरे यांचा प्रभाग 7 तर पीरअली पुणेकर यांचा प्रभाग 8 आहे. दोघांचे प्रभाग एकमेकांना जोडून आहेत. या प्रभागातील ईदगाहच्या विकास कामांशी संबंधित विषय घेऊन पुणेकर पालिकेत आले होते. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मुनिर पटवेकर हेही होते.
दरम्यान, काही कामानिमित्त संजय कोरे हेही पालिकेत आले होते. ईदगाहच्या कामावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातून दोघांनी एकमेकांना शिव्या देणे व एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. हा प्रकार घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक विश्‍वनाथ डांगे, खंडेराव जाधव आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील हे पालिकेत उपस्थित होते. मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे काहीतरी काम असल्याने हे नगरसेवक पालिकेत आल्याचे समजले. त्यांच्या समोरच वादावादीची घटना घडली. या सर्वांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे पदाधिकारी आपापल्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते. काही पूर्वनियोजित बैठक वगैरे नव्हती किंवा मी कोणत्याही कामासाठी त्यांना बोलावले नव्हते.
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर आपापसात भांडण्याचा हा प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरला. दोघांचे प्रभाग एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे दोन्ही प्रभागातील कामांचा एकमेकांशी संदर्भ असल्याची चर्चा होती.

COMMENTS