Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन

कराड / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेमध्ये वर्दळ वाढली आहे. ग

गावात नको बार-नको वाईन शॉप; वाठारच्या महिला पाठोपाठ आता पुरूषांचीही सुर
खानापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध; 37 गावात काट्याची टक्कर
करोनाविरुद्ध लढाईत हवाईदलही सहभागी, ऑक्सिजन-औषधं करणार एअरलिफ्ट | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24

कराड / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेमध्ये वर्दळ वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर शासकीय योजनेतनू मोफत बसपास देण्यात येतात. त्याचे थेट शाळेत जाऊन वाटप करण्याचा उपक्रम कराड (जि. सातारा) येथील एसटी आगाराचे व्यवस्थापक विजय मोरे यांनी राबवला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींतून समाधान व्यक्त केले आहे. हा पास काढण्यासाठी मुलींना शाळेच्या वेळेत अथवा शाळा सुटल्यानंतर तास-तास ओळीत उभे रहावे लागत होते. तसेच चिरीमिरीच्या अमिषाने बनावट कागदपत्राच्या अधारे पासाचे वाटप होत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे. तरीही बोगस पास सापडल्यास जबाबदारी कोणाची हेही राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरातील शाळांत येतात. शासनाने विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजनेतून पास दिले जातात. ते घेण्यासाठी त्यांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. कोरोनामुळे ते शक्य नसल्याने त्यांना आता थेट शाळेतच पास देण्याचा उपक्रम एसटीचे येथील आगारप्रमुख मोरे यांनी हाती घेतला आहे. त्याअंतर्गत त्याचे पहिल्यांदा प्रातिनिधिक येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 353 विद्यार्थिनींना पास वाटप करण्यात आले.
आगार व्यवस्थापक मोरे, प्राचार्य गोकुळ अहिरे, उपप्राचार्य प्रा. धनाजीराव देसाई, वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा. राजेश धुळगुडे, प्रा. संदीप जोशी, प्रा. शांतीनाथ मलाडे, प्रा. अजित कुलकर्णी, प्रा. विद्या शिर्के, प्रा. शमा शेख आदी उपस्थित होते. प्राचार्य अहिरे यांनी या उपक्रमाबद्दल एसटीच्या अधिकार्‍यांचे कौतुक केले. उपप्राचार्य देसाई यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक प्रा. राजेश धुळगुडे यांनी आभार मानले. प्रा. संदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS