Homeताज्या बातम्या

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; गोळीबारात दोघांचा मृत्यू

इम्फाल : मणिपूरमधील कांगपोकपी (Kangpokpi) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे झालेल्या हिंसक घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लावण्यात आल्या

तोहिद खान हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या-सादिक इनामदार
लॉरेन्स बिश्‍नोई गँगच्या 2 गुंडांचे एन्काउंटरप्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते
ढवळगाव शिवारात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्तदोन आरोपींना अटक ; बेलवंडी पोलिसांची कामगिरी
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दोन गटात गोळीबार, 13 जणांचा मृत्यू - Marathi  News | Manipur violence clash between two militant groups 13 people killed  in firing | TV9 Marathi

इम्फाल : मणिपूरमधील कांगपोकपी (Kangpokpi) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे झालेल्या हिंसक घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लावण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुलतूह कुकी गावात सशस्त्र हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यानंतर गावातील काही घरांना आग लावण्यात आली. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवत शोधमोहीम सुरू केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे.

कांगपोकपी जिल्ह्यात सहा नागा नागरिकांचे मृतदेह आढळल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही घटना घडल्याने राज्यातील तनाव आणखी वाढला आहे. हे मृतदेह मे महिन्यात अपहरण झालेल्या सहा व्यक्तींचे असावेत, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे नागा समुदायात संतापाची लाट उसळली आहे. हत्यांच्या निषेधार्थ विविध भागांत निदर्शने करण्यात आली. सेनापती जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या स्थानिक कार्यालयालाही संतप्त जमावाने आग लावल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

COMMENTS