धामोरी येथे व्यापारी संकुलाचा उद्घाटन सोहळा उत्साहात कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथे श्री भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या भव्य व्

धामोरी येथे व्यापारी संकुलाचा उद्घाटन सोहळा उत्साहात
कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथे श्री भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या भव्य व्यापारी संकुलाच्या फेज ४ व ५ चा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी भैरवनाथ ट्रस्टच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत, या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, आमदार विवेक कोल्हे, काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रविण शिंदे यांनी यावेळी श्री भैरवनाथ ट्रस्टच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आशीर्वादपर मनोगत व्यक्त करताना परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यापारी संकुलामुळे परिसरातील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास काळे कारखान्याचे संचालक सुनील मांजरे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, राजेभोसले, कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, विलासराव माळी, नारायणराव मांजरे, कैलासराव माळी, ज्ञानदेव मांजरे तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव भाकरे, उपाध्यक्ष दत्तात्रय पगार, विश्वस्त संपतराव भाकरे, विलासराव माळी, राहुल वाणी आणि सचिव शिवाजी वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप आहिरे यांनी केले.

COMMENTS