Homeताज्या बातम्या

राज्य पत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी प्रा. विजय कापसे; जनार्दन जगताप सरचिटणीस

कोपरगाव शहर : राज्य पत्रकार संघ, मुंबई या पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदी ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप, तर कोपरगाव तालुका

एक राखी , सैनिकांसाठी भगवान विद्यालयाने राबविला नवीन उपक्रम
आधी मोदींनी डिग्री दाखवावी, मग मी सगळं सांगतो! अभिजीत दिपकेंचा थेट पंतप्रधानांना इशारा
सीना नदी पूर नियंत्रण रेषेसाठी विचार मंचाची स्थापना

कोपरगाव शहर : राज्य पत्रकार संघ, मुंबई या पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदी ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप, तर कोपरगाव तालुकाध्यक्षपदी पत्रकार प्रा. विजय कापसे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजय भोकरे, जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे आणि जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिली.

जनार्दन जगताप हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

तर प्रा. विजय कापसे हे गेल्या ९ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, निर्भीड लेखणीच्या माध्यमातून अनेक उपेक्षित प्रश्न तसेच विकासकामांना सातत्याने वाचा फोडत आहेत. पेशाने शिक्षक असलेल्या प्रा. कापसे यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान आहे. ते दैनिक लोकमंथनचे कोपरगाव प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

प्रा. कापसे यांनी यापूर्वी संघटनेत सहसचिव आणि कार्याध्यक्ष यांसारख्या विविध पदांवर काम केले आहे. मागील दोन वर्षांपासून त्यांनी सचिव म्हणून संघटनेचे काम प्रभावीपणे पुढे नेले. पत्रकार बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.

प्रा. विजय कापसे आणि जनार्दन जगताप यांच्या निवडीबद्दल कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांसह राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS