हे देखील महत्वाचे !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

हे देखील महत्वाचे !

शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या दरम्यान अलीकडच्या काळात काही 'अर्थपूर्ण' संबंध घडविले जात असल्याचा संशय, समाज म्हणाला राहिलेला आहे. शाळेतील

सहा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढली दीड किलोची गाठ
मनपाची घरपट्टीत 75 टक्के शास्तीमाफीची तयारी…पण, लोकअदालतमध्ये; सहभाग घेण्याचे महापौर-आयुक्तांचे थकबाकीदारांना आवाहन
जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या | LOKNews24

शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या दरम्यान अलीकडच्या काळात काही ‘अर्थपूर्ण’ संबंध घडविले जात असल्याचा संशय, समाज म्हणाला राहिलेला आहे. शाळेतील शिक्षकांची गुणवत्ता ही प्रशिक्षित असली तरीही अलीकडच्या काळात कोचिंग क्लासेस किंवा खाजगी क्लासेसच्या संदर्भात एवढे पेव फुटले आहे की, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्यातून कोसळल्याशिवाय राहत नाही. त्यातच दहावी आणि बारावी नंतरच्या अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा किंवा सर्वसामाईक प्रवेश चाचणी ठेवल्यामुळे या परीक्षांत यश मिळवण्यासाठी अशा कोचिंग क्लासेसकडून केल्या जाणाऱ्या व्यावसायिक जाहिरातींचा भडिमार इतका प्रचंड असतो की, त्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंधळल्याशिवाय किंवा आत्मविश्वास गमावल्याशिवाय आणि काही करता येत नाही. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण हे काही लाखांचे शुल्क मोजून घेणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेस आज मुख्य शैक्षणिक संस्थांपेक्षाही वरचढ ठरू लागल्या आहेत. त्यातच असे अर्थपूर्ण संबंध घडविणाऱ्या या खाजगी क्लास कोचिंग क्लासेस कडून मुख्य शिक्षण संस्थांबरोबरही आतून काही गुप्त समझोते केले जातात; त्यानुसार विद्यार्थी मुख्य शैक्षणिक संस्थेला हजर राहिला नाही, तरी चालेल, परंतु, तो कोचिंग क्लासला उपस्थित असेल तर त्या विद्यार्थ्यावर मुख्य शैक्षणिक संस्थाही कोणतीही कारवाई करत नाही. अर्थात आज हा विषय एकाएकी चर्चेला घेण्यामागे कारण ही तसेच आहे. एका शैक्षणिक संस्थेने शिक्षक पदासाठी जाहिरात दिल्यानंतर त्यावर एका सोशल मीडिया वाचकाने दिलेल्या प्रतिक्रियेतून हा वाद खऱ्या अर्थाने समोर आला आहे. मुंबईतीलच एका शैक्षणिक संस्थेने शिक्षक पदासाठी दिलेल्या जाहिरातीवर फ्रान्सिस जोसेफ नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी ठरली, आणि त्यावर सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला. फॅन्सीस यांच्या मते महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्यामध्ये आता शिक्षकांची भरती फक्त आयआयटी, जीईई आणि एनइइटी यासारख्या परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठीच केली जात असल्याचा आरोप त्यांनी आपल्या सोशल मीडियातील एका प्रतिक्रियेतून व्यक्त केला. त्यांच्या मते शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना केवळ पैसे घेऊन स्पर्धात्मक युगाची आमिषे दाखवत त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचेही नुकसान यामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्याशी सोशल मीडिया वापरकर्त्या अनेक सहकाऱ्यांनी सहमती दर्शवून विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा परीक्षा किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठीच फक्त आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे शिक्षणावरचा दृष्टिकोन हा दुरावत असून केवळ एखाद्या स्पर्धेत यशस्वी होण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्याला यंत्रवत बनवून मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अर्थात यातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून किंवा त्यांच्याशी सलग्न राहून काही खाजगी कोचिंग क्लासेस या प्रवेश स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करतात आणि मुख्य शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्यामधील अर्थपूर्ण घडामोडी घडवीत असतात; ही प्रक्रिया थांबवणे, हे समाजाच्या हिताचे तर आहेच परंतु एकूणच शैक्षणिक वातावरण निकोप होण्यासाठी आणि पुढची पिढी गुणवत्ताधारी निर्माण होण्यासाठी या सर्व व्यावसायिक आणि कृत्रिम अशा मार्गदर्शन केंद्रांवर बंदी आणणे, हा यावरचा एक उपाय ठरू शकतो, अशाही प्रतिक्रिया यावर व्यक्त करण्यात आल्या आहेत. शिक्षणाचे उद्दिष्ट शैक्षणिक संस्थांचेही व्यावसायिकरण होत असल्याने संपुष्टात येऊ घातले आहे. कारण, शैक्षणिक संस्था या कोचिंग क्लासेस ला विद्यार्थ्यांचा डेटा पुरवून अशा प्रवृत्तींना चालना देत आहेत, हे कुठेतरी थांबायला हवे!

COMMENTS