अहिल्यानगर : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर्यारवी एंटरटेनमेंट संस्था, दादर (पूर्व), मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा ‘कलम रत्न’

अहिल्यानगर : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर्यारवी एंटरटेनमेंट संस्था, दादर (पूर्व), मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा ‘कलम रत्न’ पुरस्कार साहित्यिक व शिक्षक विठ्ठल गणपतराव बरसमवाड यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतर बरसमवाड यांनी लेखन क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत ११ ग्रंथांचे लेखन केले असून, विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे ५१५ हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर त्यांनी २२९ हून अधिक व्याख्याने दिली आहेत.
त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत आर्यारवी एंटरटेनमेंट संस्थेच्या वतीने त्यांना ‘कलम रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
बरसमवाड यांना यापूर्वी राजे मल्हारराव होळकर पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, मराठी भाषा रत्न पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषदेकडून साहित्य कार्य गौरव पुरस्कार तसेच आधुनिक केसरी वृत्तपत्राचा महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पाच ग्रंथांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
“विद्यार्थी आणि समाजाशी नाते जपणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असे आर्यारवी एंटरटेनमेंट संस्थेचे आयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी सांगितले.
समन्वयक गुरुनाथ तिरपणकर, केतन भोज आणि राहुल खरात यांनीही विठ्ठल बरसमवाड यांचे अभिनंदन केले.

COMMENTS