Homeताज्या बातम्या

चार पुलांसाठी १२ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर; खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार महत्त्वपूर्ण पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी ३४ लाख ८६

धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश  
चापडगावात आज वाचन संस्कृतीचा दुहेरी सोहळा
बिबट्याला कोंडून ठेवणाऱ्या आजीचा सन्मान 
खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात निलेश लंकेंनी केली ‘ही’ कृती,  होतेय सर्वत्र चर्चा

अहिल्यानगर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार महत्त्वपूर्ण पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, नगर आणि पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

नगर तालुक्यातील मठ पिंपरी ते डोबळेवस्ती मार्गावरील ९० मीटर लांबीच्या पुलासाठी ४ कोटी ६६ लाख ५३ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

पारनेर तालुक्यातील डिकसळ ते जामगाव मार्गावरील पुलासाठी २ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच गरखिंडी ते आळकुटी मार्गावरील दोन पुलांच्या बांधकामासाठी अनुक्रमे २ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपये आणि २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या पुलांचा मोठा फायदा शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन स्थानिक बाजारपेठांशी संपर्क वाढणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधांपर्यंत पोहोचणेही नागरिकांना सोपे होणार आहे.

चौकट : मंजूर कामे व निधी

  • मठ पिंपरी-डोबळेवस्ती, ता. नगर — ९० मीटर पूल : ४ कोटी ६६ लाख ५३ हजार रुपये
  • डिकसळ-जामगाव, ता. पारनेर — पूल : २ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये
  • गरखिंडी-आळकुटी, ता. पारनेर — पूल : २ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपये
  • गरखिंडी-आळकुटी, ता. पारनेर — दुसरा पूल : २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये
  • एकूण मंजूर निधी : १२ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये

COMMENTS