Homeताज्या बातम्या

शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड

बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा करण्यात आली. शिवसेन

जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक संपन्नशाळांमध्ये विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
नागरिकांनी जनगणना स्वतः करून घ्यावी-ब्राईट सोशल फाउंडेशनचे आवाहन
आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी



बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा करण्यात आली. शिवसेना (उबाठा) विरोधी पक्षनेते आमदार अंबादासजी दानवे यांच्या हस्ते आणि बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख राजुभाई यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गेवराई शहरप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना (उबाठा) बीड जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम आणि गेवराई तालुकाप्रमुख अजय भैय्या दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेख राजुभाई यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शेख राजुभाई यांच्या निवडीमुळे गेवराई शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल, तसेच नव्या कार्यकर्त्यांना जोडण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये रफीक बागवान, महेबुब शेख, मुस्तफा शेख, शरद ढवारे, मुजीब शाह, रईस टेलर, मुनाफ मौलाना, बाबू शेख, चांद भाई, मोहम्मद दानिश, अब्दुल्ला चाऊस, क्रिष्णा चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश होता. कार्यकर्त्यांनी नवनियुक्त शहरप्रमुख शेख राजुभाई यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. त्यांच्या निवडीमुळे गेवराई शहरातील अल्पसंख्याक समाज आणि तरुण वर्गाला पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेख राजुभाई यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.

COMMENTS