Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कॅप्टन शुभमन गिलला बीसीसीआयचा दणका; ‘या’ चुकीमुळे ठोठावला १२ लाखांचा दंड!

https://www.youtube.com/watch?v=2_IoFuWtCZk दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला, प

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भावूक निरोप; सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा!
सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
रोहितचे शतक, विराटचे अर्धशतकही अपुरे; लॉर्ड्सवर भारताचा 27 धावांनी पराभव, इंग्लंडची मालिका 2-1 ने खिशात

दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला, पण षटकांच्या संथ गतीमुळे कर्णधार शुभमन गिलला शिक्षा भोगावी लागली. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 211 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. दिल्ली कॅपिटल्सने जोरदार झुंज देत 19 षटकांत 6 गडी गमावून 198 धावा केल्या. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती आणि सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र, गुजरातच्या षटकांची गती संथ झाली
यामुळे संघाला फटका बसला. नियमांनुसार, 30-यार्ड सर्कलमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला, ज्यामुळे दबाव आणखी वाढला.
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत शुभमन गिलला 12 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या हंगामात गुजरातने षटकांच्या संथ गतीच्या नियमाचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ होती. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील शेवटचे षटक थरारक ठरले.
दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील हा पहिला पराभव होता, तर गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या विजयाने सुटकेचा निःश्वास टाकला. विजयानंतरही, षटकांच्या संथ गतीमुळे गुजरात टायटन्स संघाला मोठा फटका बसला.

COMMENTS