Homeताज्या बातम्या

वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोजकरांना ऊर्जा : कवाद

निघोज: वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोज व परिसरातील ज्येष्ठ व युवा मंडळींना एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक

नगर-बायपास जवळील मुख्य जलवाहिनीला गळती; टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
राज्यात लवकरच ८८ नवीन महसूल कार्यालये प्रस्तावित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, हरकती व सूचना मागविल्या
समान नागरी कायद्याच्या दिशेने पण..!

निघोज: वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोज व परिसरातील ज्येष्ठ व युवा मंडळींना एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी मेजर विकास वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे राहणार असल्याचे प्रतिपादन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी केले.

पत्रकार संघ आणि ग्रामस्थांच्या वतीने वृक्षलागवड

मंगळवारी (दि. २३) पारनेर तालुका व शिरूर तालुका पत्रकार संघ, मळगंगा विद्यालय, आजी-माजी सैनिक संघटना, निघोज ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेताळबाबा स्टेडियम परिसरात ५० पेक्षा जास्त विविध रोपांचे वनीकरण करत वृक्षलागवड करण्यात आली. ही पर्यावरण पूरक मोहीम ज्येष्ठ नेते प्रभाकर कवाद, धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष वराळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठलराव कवाद, मुंबईकर मंडळाचे पदाधिकारी देवराम बुवा लामखडे आणि मेजर विकास वराळ आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या वृक्षलागवड प्रसंगी मेजर गोपाळ वराळ, मेजर विजय वराळ, मेजर अमोल ठुबे, सुभेदार संजय लेंभे, मुख्याध्यापिका रेखा हराळ, माळी, वरखडे, लेंभे, राहुल पोपळघट आणि शंकरराव वरखडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद आणि पत्रकार सागर आतकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता करताना, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीबद्दल पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS