कोरोनामुक्तांचे प्रमाण घटले आठ टक्क्यांनी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुक्तांचे प्रमाण घटले आठ टक्क्यांनी

पुणे विभागातील कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढल्यामुळे, विभागातील कोरोनामुक्तीचा वेग कमी झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
आगामी काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सिन्नर तालुक्यात शांतिगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्फुर्त स्वागत 

पुणे/प्रतिनिधीः पुणे विभागातील कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढल्यामुळे, विभागातील कोरोनामुक्तीचा वेग कमी झाला आहे. दोन महिन्यात हे प्रमाण तब्बल आठ टक्‍क्‍यांनी घटले आहे. आज कोरोनामुक्तीचे  प्रमाण 89 टक्के इतके आहे. 

दरम्यान, गेल्या 24 तासांत विभागामध्ये आठ हजार 455 नवीन बाधित सापडले असून, त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यातील बाधित संख्या 7 हजार 90 आहे. पंधरा दिवसांत बाधित सापडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले; मात्र कaरोनामुक्तीचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे. आज चार हजार 248 बाधित कोरोनामुक्‍त झाले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुणे विभागातील कोरोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्‍के इतके होते.  आज हे प्रमाण 89 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. मागील चार दिवसांपासून बाधित संख्येने सहा ते सात हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे हा वेग आणखी कमी झाल्याचे दिसून येते. विभागामध्ये आजपर्यंत सात लाख 24 हजार 654 कोरोना बाधित सापडले असून, त्यातील सहा लाख 45 हजार 603 जण कोरोनामुक्‍त झाले. 17 हजार 16 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या 62 हजार 35 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

COMMENTS