Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाराशिवमध्ये जन्मले 24 बोटांचे बाळ

दुर्मिळ घटनेची मराठवाड्यात चर्चा

धाराशिव / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना असून उम

राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात
‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत.
राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

धाराशिव / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून एक दुर्मिळ घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना असून उमरगा शहरातील एका मातेने चक्क 24 बोटे असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.

बाळाच्या हाताला आणि पायांना प्रत्येकी 6 बोटे आहेत. त्यामुळे, या बाळाची आणि या बाळाच्या आईची शहरात मोठी चर्चा होत आहे. बाळ आणि बाळाची आई हे दोघे ही सुखरूप असल्याची माहिती डॉ. नचिकेत इनामदार यांनी दिली.

बाळाच्या आईची ही दुसरी प्रसुती असून त्यांचे नाव रेणुका सागर वीटकर असे आहे. रेणुका यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी सहा बोटे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती कळताच गावातील अनेकजण उत्सुकतेने बाळाला पहायला येत आहेत. उमरगा शहरात सध्या या बाळाचीच चर्चा होताना दिसत आहे.

COMMENTS