विमानतळ आंदोलनप्रकरणी आमदार, महापौरांवर गुन्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विमानतळ आंदोलनप्रकरणी आमदार, महापौरांवर गुन्हे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणार्‍या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले ः चैतालीताई काळे
लोकप्रतिनिधी निलंबित केले तर, लोकशाहीचे भवितव्य काय ?
पत्नीचे प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणार्‍या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा मोठ्या वादाचा विषय ठरला असून दि. ब. पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे या समर्थनार्थ पालघर ते रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात दाखल झाले होते. त्यामुळे या ठिकाणी विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले. 

चार माजी खासदार, दोन माजी मंत्री, सात आमदार, दोन माजी आमदार, नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर, पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. शिवाय त्यांच्या जवळपास 18 ते 20 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलकांना मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवरील सर्व लोकप्रतिनिधी आणि 18 ते 20 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कृती समिती अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेचे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, मयुरेश कोटकर यांच्यासह हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

COMMENTS