Homeताज्या बातम्या

माजी आ.तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित  

संगमनेर : राष्ट्रसेवा दलातर्फे दिला जाणारा साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार यंदा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील सा

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख बीडमध्ये येणारसा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती
काव्याची उत्कृष्ट कामगिरी,आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक!
सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर


संगमनेर : राष्ट्रसेवा दलातर्फे दिला जाणारा साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार यंदा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील साने गुरुजी स्मारक, सिंहगड येथे झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. शैला दाभोळकर, शिरीष चौधरी, कपिल पाटील, सुरेश ठाकूर, नितीन वैद्य, साजदा निहाल अहमद, भीमराव आंबेडकर, हेमंत नाईकनवरे, जयवंत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कवी प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांची प्रकट मुलाखत घेतली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. तांबे म्हणाले, ‘‘लहानपणापासून घरात पुरोगामी विचारांचे वातावरण होते. महात्मा फुले यांच्यावरील साहित्य वाचनातून सामाजिक प्रश्नांविषयीची जाणीव अधिक दृढ झाली. संगमनेरमध्ये वास्तव्यास असताना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, बी. जे. खताळ पाटील आणि भास्करराव दुर्वे यांच्या सहवासातून सार्वजनिक जीवनाची प्रेरणा मिळाली.’’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘तरुणांच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ आणि संविधान मूल्यांवर आधारित समाज घडविण्याचे काम सुरू आहे. आगामी काळातही हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न राहील.’’ प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या साधेपणा, अभ्यासू वृत्ती आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीचा गौरव केला. शिरीष चौधरी, डॉ. शैला दाभोळकर आणि कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, डॉ. सुधीर तांबे यांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS