Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रम कौतुकास्पद :  तोटेवाड

श्रीगोंदा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मढेवडगाव येथील उंडेमळा जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व उपयुक्त उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून इतर शाळांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन वसमत (जि. हिंगोली) येथील गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत तपासणी समितीने उंडेमळा शाळेस भेट दिली असता त्यांनी शाळेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शाळेत राबविण्यात येणारे हस्ताक्षर सुधार उपक्रम, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ‘झटपट वाचन’ प्रकल्प, कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, शिवजयंती उत्सव, ‘किल्ले बनवा’ स्पर्धा तसेच ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत लोकसहभागातून शाळेचा होत असलेला विकास यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांशी सातत्याने ठेवला जाणारा संपर्क आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरण यामुळे शाळेने वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मढेवडगाव ग्रामपंचायतीलाही भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.  या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी एम. पी. पाटील, विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, बाळासाहेब कदम, काकासाहेब खोसे, एम. ए. वाघ, सारिका हराळ, डी. ए. मांढरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शालन थोरात, पर्यवेक्षिका पूजा पाडळे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश अलगुंडे, रामप्रसाद काळे, संगणक ऑपरेटर ज्ञानेश्वर डोके, लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच सुनिता उंडे, माजी उपसरपंच अमोल गाढवे, ग्रामपंचायत सदस्य 

अरणगाव शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
 ‘एसएसजीएम’चा एचएससी निकाल उल्लेखनीय

श्रीगोंदा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मढेवडगाव येथील उंडेमळा जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व उपयुक्त उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून इतर शाळांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन वसमत (जि. हिंगोली) येथील गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत तपासणी समितीने उंडेमळा शाळेस भेट दिली असता त्यांनी शाळेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शाळेत राबविण्यात येणारे हस्ताक्षर सुधार उपक्रम, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ‘झटपट वाचन’ प्रकल्प, कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, शिवजयंती उत्सव, ‘किल्ले बनवा’ स्पर्धा तसेच ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत लोकसहभागातून शाळेचा होत असलेला विकास यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांशी सातत्याने ठेवला जाणारा संपर्क आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरण यामुळे शाळेने वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी मढेवडगाव ग्रामपंचायतीलाही भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.  या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी एम. पी. पाटील, विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, बाळासाहेब कदम, काकासाहेब खोसे, एम. ए. वाघ, सारिका हराळ, डी. ए. मांढरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शालन थोरात, पर्यवेक्षिका पूजा पाडळे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश अलगुंडे, रामप्रसाद काळे, संगणक ऑपरेटर ज्ञानेश्वर डोके, लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच सुनिता उंडे, माजी उपसरपंच अमोल गाढवे, ग्रामपंचायत सदस्य 

COMMENTS