Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

कर्जत : महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात सिद्धार्थ बोर्डिंग बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आणि रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वस्तीग्रह या तीनही वसतिगृहांनी एकत्र येत  सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ६ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सप्ताह साजरा होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि सामाजिक समतेचा विचार रुजावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सप्ताहानिमित्त आयोजित प्रमुख कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान, मार्गदर्शन सत्र तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहाय्यक गटशिक्षणाधिकारी रूपचंद जगताप ,गट शिक्षणाधिकारी  प्रदीप चव्हाण, तसेच पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी  दीपक समुद्र, वस्तीगृहाचे अधीक्षक रामदास पेटकर अधीक्षक लालासाहेब वाघमारे अधीक्षक प्रमोद भैलुमे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी  यांनी आयोजित केलेल्या या सप्ताह बद्दल सर्व वस्तीगृहाच्या अधीक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे सर्व कार्यक्रम त्यांच्या भावी जीवनासाठी निश्चितपणे उपयोगी ठरणार आहेत असे सांगितले. सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजात बंधुता, समानता आणि न्याय यांचे मूल्य रुजविण्याचा प्रयत्न होत असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोंभळी महसूल मंडळात महाराजस्व अभियान उत्साहात 
भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अनारसे
सत्तेसाठी दबावतंत्र, राजकीय सूड : नगराध्यक्ष घुले ; गटनेते बदलावरून वाद चिघळला; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र

कर्जत : महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात सिद्धार्थ बोर्डिंग बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आणि रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वस्तीग्रह या तीनही वसतिगृहांनी एकत्र येत  सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ६ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सप्ताह साजरा होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि सामाजिक समतेचा विचार रुजावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सप्ताहानिमित्त आयोजित प्रमुख कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान, मार्गदर्शन सत्र तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहाय्यक गटशिक्षणाधिकारी रूपचंद जगताप ,गट शिक्षणाधिकारी  प्रदीप चव्हाण, तसेच पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी  दीपक समुद्र, वस्तीगृहाचे अधीक्षक रामदास पेटकर अधीक्षक लालासाहेब वाघमारे अधीक्षक प्रमोद भैलुमे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी  यांनी आयोजित केलेल्या या सप्ताह बद्दल सर्व वस्तीगृहाच्या अधीक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे सर्व कार्यक्रम त्यांच्या भावी जीवनासाठी निश्चितपणे उपयोगी ठरणार आहेत असे सांगितले.

सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजात बंधुता, समानता आणि न्याय यांचे मूल्य रुजविण्याचा प्रयत्न होत असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

COMMENTS