Homeताज्या बातम्या

स्टॉक बोर्डावर युरिया उपलब्ध, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नकारश्रीगोंद्यातील हिरा कृषी सेवा केंद्रातील प्रकार; चौकशीची मागणी

डॉ. अशोक सोनवणे/अहिल्यानगर  : खरीप हंगाम तोंडावर असताना खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील  हिरा कृषी सेवा केंद्रात स्टॉक बोर

कोतुळच्या स्वप्निल बोऱ्हाडेची एमएसएफमध्ये निवड
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू

डॉ. अशोक सोनवणे/अहिल्यानगर  : खरीप हंगाम तोंडावर असताना खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील  हिरा कृषी सेवा केंद्रात स्टॉक बोर्डवर युरिया उपलब्ध असल्याचे स्पष्टपणे नमूद असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना “युरिया शिल्लक नाही” असे सांगून परत पाठविले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.दुकानासमोर लावलेल्या स्टॉक बोर्डावर ‘युरिया – ९४ पोती शिल्लक’ असल्याची नोंद दिसून येते. मात्र, युरिया खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे स्टॉक बोर्डावरील माहिती आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत असल्याचा आरोप होत आहे.सध्या पेरणीनंतर पिकांना युरियाची मोठी गरज असताना अनेक शेतकरी युरियासाठी दुकानांवर फेऱ्या मारत आहेत. अशा वेळी स्टॉक असूनही खत दिले जात नसल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दुकानातील प्रत्यक्ष खतसाठा, स्टॉक बोर्डावरील नोंदी आणि विक्रीची पडताळणी करावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी रिलीज केला नाही…कृषी सेवा केंद्र चालकाशी संपर्क साधला असता ”आमच्याकडे बफर स्टॉक असून अद्याप जिल्हाधिकारी यांनी तो रिलीज केला नाही” असे त्यांनी सांगितले.

COMMENTS