Homeताज्या बातम्या

सरकारी स्वस्त धान्य दुकानावर मध्यरात्री दरोडाराहुरी खुर्द येथील घटना ; १२ क्विंटल गहू-तांदूळ लंपास

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत सुमारे १२ क्विंटल गहू-तांदूळ तसेच एक टेबल फॅन लंपास केल्याची घटना रविवारी (दि. ५) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोरगरिबांसाठी असलेल्या धान्याची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.राहुरी खुर्द येथील हनुमान मंदिर परिसरात काळुबाई महिला बचत गटाच्या माध्यमातून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान चालविले जाते. या दुकानाचे चालक सोमनाथ पागिरे यांच्या मातोश्री सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेल्या असता दुकानाचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती सोमनाथ पागिरे यांना दिली.पागिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानाची पाहणी केली असता दुकानाच्या पुढील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता सुमारे १२ क्विंटल गहू-तांदूळ आणि एक टेबल फॅन चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार, ग्राम महसूल अधिकारी तुषार काळे तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे हवालदार अर्जुन दारकोंडे आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून अहिल्यानगर येथील ठसेतज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. विविध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके कार्यरत केली आहेत.भरवस्तीतील सरकारी स्वस्त धान्य दुकानालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गोरगरिबांसाठी असलेल्या धान्याची चोरी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरोडा,चोरीच्या वाढत्या घटनांनी चिंतामागील काही दिवसांत चोरी, दरोडे आदी घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, आरोपी ताब्यात घेत त्यांच्यावर जरब बसवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

विशेष मोहिमेत श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाईअजामीनपात्र वॉरंटमधील २१ आरोपी अटकेत; अनेकांची तुरुंगात रवानगी
परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

COMMENTS