Homeताज्या बातम्यादेश

केंद्रीय मंत्री कोशल किशोरच्या घरी तरूणाची हत्या

मुलाच्या बंदुकीतून झाडली तरूणावर गोळी उत्तरप्रदेशातील घटना

लखनौ/वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरी एका तरुणाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. मंत्र्यांच्या मुलाच्य

मुळव्याध, भगंदर आजारावर आता मोफत शस्त्रक्रिया
धक्कादायक…जाणीवपूर्वक 15 वाहने जाळली | LOKNews24
राहुरी तालुक्यात दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

लखनौ/वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरी एका तरुणाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. मंत्र्यांच्या मुलाच्या पिस्तुलाद्वारे हा गुन्हा घडला. घरात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. विनय श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास ऊर्फ आशू याचा तो मित्र आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीने विकास कौशल यांच्या बंदुकीतून गोळी झाडली असून डोक्याला गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा लखनौचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या लखनौतील बंगल्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विनय श्रीवास्तव असे आरोपीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. लखनौ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती लखनौचे डीसीपी राहुल राज यांनी दिली आहे. पोलिसांनी कौशल किशोर यांच्या बंगल्यातून एक बंदूक जप्त केली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचेही राहुल राज यांनी म्हटले आहे. कौशल किशोर यांच्या बंगल्यात गुरुवारी रात्री एकूण सहा लोक आले होते. सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर अचानक बंगल्यात गोळीबार सुरू झाला. आरोपीने केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांच्या बंदुकीतून गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची चौकशी सुरू केली असून तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचे लखनौ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS