Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन

नाशिक- आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने तृणधान्य व भरड धान्य यांचे दैनंदिन आहारातील महत्वाबाबत जनजागृतीसाठी जागतिक औषध निर

व्हिजेएनटी मधील भामटा शब्द कायम ठेवा ; बंजारा समाजाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
मालमत्ता करवसुलीत मुंबई महापालिकेत 2100 कोटींची तूट
उत्तर भारतात थंडीची लाट ; महाराष्ट्र गारठला

नाशिक- आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने तृणधान्य व भरड धान्य यांचे दैनंदिन आहारातील महत्वाबाबत जनजागृतीसाठी जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त 25 सप्टेंबर 2023 रोजी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आणि क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त नाशिक सं.भा. नारागुडे यांनी दिली.

वॉकेथॉनची सुरवात व्ही एन नाईक फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली होती. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सर्वश्री उदय लोहकरे, विवेक पाटील, मनीष सानप, प्राचार्य ए. बी. दरेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉन रॅलीला सुरवात केली. या रॅलीत सुमारे 2 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी तृणधान्य वापराचे महत्व याबाबत बॅनर व फलक धारण केले होते. यासोबतच तृणधान्याच्या आहारातील महत्वाविषयी विद्यार्थ्यांनी घोषणाही यावेळी दिल्या. रॅलीचा मॅग्नम हॉस्पिटल, किलबिल विद्यालय, कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर मार्गे व्ही. एन. नाईक महाविद्यालयात येवून समारोप झाला.

COMMENTS