Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरेंचा आढळला मृतदेह

मुंबई/प्रतिनिधी : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर मो

वाळू माफियाप्रमाणे लँडमाफियांना महसूलमंत्री लगाम घालणार का ?
घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला
ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा

मुंबई/प्रतिनिधी : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या जवळ रुळांवर आढळून आला. त्यांनी लोकल समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र ही आत्महत्या आहे की, घातपात यावर अनेक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वेखाली सुधीर मोरे चिरडले गेल्याने त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काल (31 ऑगस्ट) रात्री त्यांना कुणाचा तरी फोन आला. त्यानंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी खासगी सुरक्षारक्षकाला सांगितले आणि ते बाहेर पडले. ते रिक्षाने गेले. घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली त्यांनी स्वत:ला गाडीखाली झोकून दिले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. सुधीर मोरे हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते. विक्रोळी पार्कसाईट परिसरातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मुंबई महापालिकेत त्यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्वही केले होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. महापालिका प्रभागातील वर्चस्व आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी शिवसेनेत अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे विभागप्रमुख पदही मिळवले होते. विभागप्रमुख असतानाही त्यांनी ईशान्य मुंबईत संघटना मजबूत करण्याचे काम केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिले होते. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कामाचा धडाका लावला होता. जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमांत ते पुढाकार घेत होते. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांनाही धक्का बसला आहे.

निकटवर्तीयांचे गंभीर आरोप – सुधीर मोरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून बोलले जात आहे. सुधीर मोरे यांचा मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्या जवळच्या लोकांनी केली आहे.

COMMENTS