Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

दुचाकी नालीत पडून 2 युवकांचा मृत्यू; सोनखेड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नसल्यामुळे आश्चर्य

लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे दुचाकी नालीत पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून मयत युवक हे लोंढे सांगवी येथे लग्न न

मुक्त विद्यापीठात एम. ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाची उद्बोधन कार्यशाळा संपन्न
मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात
१४ व्या राष्ट्रीय सबज्युनीअर चॉकबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न 



लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे दुचाकी नालीत पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून मयत युवक हे लोंढे सांगवी येथे लग्न निमित्ताने गावात येत असताना रस्त्याच्या नालीत दुचाकी कोसळून अपघात झाला आहे. परंतु या घटनेची नोंद सोनखेड पोलीस ठाण्यांतर्गत झालेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोंढे सांगवी येथील चंद्रकांत बाजी लोंढे (19, रा. लोंढे सांगवी) व गणेश साईनाथ गिरे (17, रा. सरेगाव, ता. मुदखेड) हे 9 मे रोजी लग्नाचा विधी आटोपून दोघेही जण शालेय कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी जोशी सांगवी येथे आले होते. आपले काम आटोपून परत असताना लोंढे सांगवी गावाजवळील एका धोकादायक वळणावर त्यांचे दुचाकी नियंत्रण सुटून थेट दुचाकी उघड्या नालीत कोसळली. या घटनेत गणेशचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रकांत यास नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन्ही तरुण आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते, त्यांच्या जाण्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदरील घटनेमुळे लोंढे सांगवी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातानंतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत अधिकारी नजीर शेख यांनी सदरील बांधकाम माझ्या काळातील नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. तर माजी उपसरपंचांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याचे सांगितले. सदरील नालीवर चेंबर नसणे आणि धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक नसणे, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे. दोन निष्पाप मुलांच्या मृत्यूनंतरही यंत्रणा केवळ तक्रार नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.  विशेष म्हणजे, या घटनेची पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद झाली नसली, तरी सोनखेड पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि अदृश्य मृत्यूच्या या सापळ्यांवर चेंबर बसवले जातील का? अशा प्रश्नांनी लोंढे सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री उशिरा दोन्ही तरुणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS