व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ;   २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ; २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण

सोनई येथील व्यकेटेश सहकारी पतसंस्था तील कर्मचारी व संचालक मंडळ यांनी तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा प्रकरणी दोन संचालक गजाआड करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे.

मॅरेथॉनमध्ये सलग 11 व्या वर्षी हजारोंच्या संख्येने धावले संगमनेरकर
नगरच्या धावपटूंनी गाजवली कोल्हापूरची मॅरेथॉन
शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल | LokNews24

सोनई : सोनई येथील व्यकेटेश सहकारी पतसंस्था तील कर्मचारी व संचालक मंडळ यांनी तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा प्रकरणी दोन संचालक गजाआड करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे. बाकी सर्व संचालक मंडळ फरार झाल्याने त्यांची अटक टळली आहे.ही कारवाई काल ( ४ रोजी) सकाळी सकाळी गावात धरपकड करण्यात आली तेव्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

       या बाबत माहिती की,दोन कोटीच्या अफरातफर प्रकरणी काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता,ठेवीदारांचे पैसे मिळत नव्हते, जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांच्या नाकावर टिकचून आपापले व्यवसाय करत होते, त्यांनी पोलीस प्रशासनाचा धाक केव्हाच गुढळून ठेऊन आमचे कोणी काही करू शकत नाही,आमचे वरपर हात आहे,अशी धमकी ठेवीदाराला सर्रास देत होते, परंतु शुक्रवारी सकाळीच मा.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गावात धरपकड सुरू करताच अनेक संचालक फरार झाले,त्यात संचालक तेजकुमार गुंदेचा,व गोपाल कडेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नेवासा न्यायालयात हजर करून नगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरकडे नेण्यात आले.        या पतसंस्था च्या घोटाळ्यातील या अगोदर तीन कर्मचाऱ्यांना अटक झाली होती, त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी काही रक्कम जमा करून जामिनावर सुटले आहे.पैकी एक तुरुंगात आहे,त्यानंतर या संचालकांना गजाआड केले आहे. आता बाकीचे म्होरके कधी गजाआड होतील  याकडे ठेवीदार सभासदाचे लक्ष लागले आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून संचालकांवर गुन्हे दाखल झाले होते, तेव्हापासून आरोपींना अटक करण्यात येत नसल्याने पोलीसाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात होता, परंतु ही कारवाई मा.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई अशीच राबवून बाकी सर्व संचालकांवर गजाआड  करून ठेवीदारांचे पैसे मिळतील अशी आशा पल्लवित झाल्या आहेत.

COMMENTS