Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून नगराध्यक्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे पॅम्पलेट शहरभर वाट

व्हीएसआर कंपनी विरोधाची भूमिका कायम : पार्थ पवार
पुण्यातील चंदननगरमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा चिरला गळा
गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या  साहित्यासह साडेतीन लाख जप्त - Marathi News | Crime News: Gambling raids; A  case has been registered against 22 ...

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून नगराध्यक्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे पॅम्पलेट शहरभर वाटण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पॅम्पलेटमध्ये देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे, त्यांचे पती बालाजी टेकाळे तसेच भाऊ लक्ष्मण टेकाळे यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांच्या खासगी जागेवर कथितरीत्या जुगार क्लब चालवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून देगलूर शहरातील विविध भागांत हे पॅम्पलेट रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. काही नागरिकांनी या पॅम्पलेटचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने काही वेळातच हे प्रकरण शहरभर चर्चेचा विषय बनले. विशेष म्हणजे या पॅम्पलेटमध्ये केवळ जुगार क्लब चालवण्याचाच नव्हे, तर त्या ठिकाणी दारू आणि महिलांचीही व्यवस्था केली जात असल्याचा खळबळजनक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. पॅम्पलेट कोणाकडून छापण्यात आले, ते शहरात कोणी आणि कोणत्या उद्देशाने वाटले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या पत्रकावर कोणाचेही नाव, पत्ता किंवा संघटनेचा उल्लेख नसल्यामुळे या प्रकारामागे नेमके कोण आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही जण हे राजकीय वैमनस्यातून घडवून आणलेले षडयंत्र असल्याचे बोलत आहेत, तर काहींनी या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देगलूर शहरात अशा प्रकारचा कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी या पॅम्पलेटमधील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेमुळे देगलूर शहरातील राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपांबाबत सत्य काय, हे आगामी काळात पोलीस तपास अथवा संबंधितांच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS