Homeताज्या बातम्या

पंतप्रधानांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी अल्पवयीन मुलीकडून माफी; गुन्हा मागे घेणार का? अभिजित दीपके यांचा सवाल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीने स

भारत-अमेरिका करार अंतिम टप्प्यात! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार
’महाराष्ट्र शासन’ आणि ’सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?
हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली; मालाडचे चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक
कॉकरोच जनता पार्टी' बनाने से पहले अभिजीत दीपके क्या कर रहे थे - BBC News  हिंदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीने सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे. हात जोडून प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये तिने, “मी केवळ १५ वर्षांची असून ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक आहे,” असे सांगत आपल्या वक्तव्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा सरकार मागे घेणार का, असा थेट प्रश्न कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या नव्या व्हिडिओमध्ये संबंधित मुलगी सांगते की, ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत कॅनॉट प्लेस परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी जवळच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या ठिकाणी काहीजण पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देत होते. त्या वातावरणाचा आणि गर्दीच्या प्रभावाचा परिणाम झाल्याने आपणही अयोग्य शब्दांचा वापर केला, अशी कबुली तिने दिली. यापुढे अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही, अशी ग्वाहीही तिने दिली आहे.

या घटनेनंतर संबंधित मुलीविरुद्ध ३० जुलै रोजी नोएडा येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.

पंतप्रधानांनी दिला होता क्षमाशीलतेचा संदेश

या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत खात्यावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी स्वतःला आणि आपल्या मातोश्रींना आक्षेपार्ह शब्दांत उद्देशून बोलणाऱ्या मुलांना माफ करण्याची भूमिका व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की, बालपणात अनेकदा चुका घडतात; मात्र त्या चुका सुधारण्याची संधीही त्याच वयात असते. भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा मुलांबद्दल द्वेष न बाळगता त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

माफ केल्यावर गुन्हा मागे घेणार का? : अभिजित दीपके

पंतप्रधानांनी मुलांना माफ करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली. “जर पंतप्रधानांनी संबंधित विद्यार्थ्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हेही सरकार मागे घेणार का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS