Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यातील जनतेचे जीवन उध्दवस्त होणार? पाटण तालुका नक्षलग्रस्त घोषित करा.

पाटण तालुक्यात माणसं राहतात कि जनावर?पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र आहे. या जंगलात गवे, बिबट्या, अस्वल, रानडुकरे मोठ्या संख्येने

शासकीय वसतिगृहात बाल लैंगिक अत्याचाराबाबत समुपदेशन कार्यक्रम
थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर


पाटण तालुक्यात माणसं राहतात कि जनावर?
पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र आहे. या जंगलात गवे, बिबट्या, अस्वल, रानडुकरे मोठ्या संख्येने आहेत. या प्राण्यांकडून मानवी वस्तीत येऊन माणसांवर, पाळीव जनावरांवर हल्ल सुरू आहेत. तसेच शेतीच नुकसान करत आहेत. आजवर कित्येकजण या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. तसेच काहीजण जायबंदी झाले आहेत. आता आणखी वाघ सोडणार म्हटल्यावर पाटण तालुक्यात माणसे राहतात की जनांवरे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पाटण / प्रतिनिधी : अनेक पर्यावरण पुरक प्रकल्प, रानटी प्राण्यांचा त्रास याचा पाटण तालुक्यातील जनतेचा संघर्ष सुरू असताना आता चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत सोडणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर मधील मोहर्ली येथील कार्यक्रमादरम्यान दिली आहे.
यामुळे तालुक्यातील मानवी जीवन उध्दवस्त करण्याचा घाट शासनाने द्यायला आहे की काय असा सवाल जनतेतून केला जात आहे. आता पाटण तालुका नक्षलग्रस्त तालूका जाहीर करा, असा संतप्त सवाल येथील जनता करत आहे. याला जनतेतून तीव्र विरोध होत आहे.
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष तिथे वाढत असल्याने चंद्रपूरमधील वाघ कमी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. हि धक्कादायक बाब समोर येत असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील मुक्त वन्य प्राण्यांना आवरण्यास वनविभाग अपयशी ठरले असताना येथे आधीच मानव व वन्यजीव यांचा संघर्ष सुरू आहे. आता या संघर्षात नव्याने वाघांची भर पडणार आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील बिबट्या, गवे, अस्वल, रानडुकरे, माकडे आदी वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत मुक्त वावर सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी वन्य प्राण्याकंडून शेतकर्‍यांची पाळीव जणावरे, शेती, आणि मानवावरील हल्ले वाढले आहेत. वन्य प्राण्यांच्या दहशतीने शेतकरी आपल्या हक्काच्या शेतात मुक्त वावर करु शकत नाही. या दहशतीने येथील शेतकरी पूर्ण उध्दवस्त झाला आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील मुक्त वावर रोखण्यास वन व वन्यजीव विभाग पूर्ण अपयशी ठरला आहे. या विभागाकडून कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. असे असताना आता सह्याद्रीच्या मानगुटीवर चंद्रपूर येथील ताडोबातील आठ वाघांचा हल्ला होणार आहे. हे वाघ आणण्यासाठी वन विभागाचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत.

सह्याद्रीच्या जंगलात खाद्यासह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत घुसखोरी
सह्याद्रीच्या जंगलाच्या परिक्षेत्रापेक्षा वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे या वन्य प्राण्यांना पुरेसे पाणी व खाद्य उपलब्ध होत नाही. परिणामी हे प्राणी पाण्यासह खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसत करत आहेत. या घुसखोरीमुळे येथील मानवी जीवन उध्वस्त होताना दिसत आहे. मानवी वस्तीत वन्य प्राण्यांची घुसखोरी रोखण्यास वन व वन्यजीव विभाग पूर्ण अपयशी ठरले आहे. यामुळे सह्याद्रीत देखील मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत आसताना दिसत आहे. यात आता वाघांची भर पडत असल्याने हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS