Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सखाराम लांडगे यांच्या दोन शेळ्या वर बिबट्या ने हल्ला चढवत त्यांना मारुन टाकल्याने मा

केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला
घोडशिंग तांड्यावरील बिबट्याचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सखाराम लांडगे यांच्या दोन शेळ्या वर बिबट्या ने हल्ला चढवत त्यांना मारुन टाकल्याने माहेगाव देशमुख परिसर बिबट्याच्या अधिवासाने भयभीत झाला आहे.
माहेगाव देशमुख ग्रामपंचायत समोर लांडगे वस्ती मध्ये सोमवारी रात्री साडेअकरा च्या सुमारास गोठ्या बाहेर बांधलेल्या विस हजार रुपये किंमती च्या दोन शेळ्या वर बिबट्या ने हल्ला केल्याने त्याचा जागिच म्रत्यु झाला कुत्रे जोर जोराने भुंकण्याचा आवाज ऐकून लांडगे वस्ती वरील लोक जागे झाले तेंव्हा बिबट्या त्यांना बघुन मकाच्या शेतात पसार झाला दावे बांधले ल्या ऐका शेळी चे नरडे फोडले  होते तर एकिचे पोट हल्ला झालेल्या ठिकाणी शेतामधील माती मध्ये बिबट्या च्या पायाचे ठसे भर वस्ती मध्ये आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहे दोन दिवसापूर्वी माहेगाव देशमुख कुभांरी शिवे वर असणार्‍या वन जमिनीलगत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या भिमा माळी यांच्या कळपातील एक शेळी बिबट्या ने अलगत उचलून नेत राखीव वनात नेवून फडशा पाडला तालुक्यात गोदावरी नदीच्या च्या तिरावर बारमाही ऊसाची व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्या च्या अधिवासाचे दर्शन नागरिकांना होत असते तालुक्यात मणुष्य हाणीचे प्रकार घडले नसल्याची नोंद झाली नसली तरी शेतकर्‍यांच्या पशुधना वर बिबट्या चे सातत्याने हल्ले होत असतात मंजूर शिवारात उपासमारी मुळे बिबट्या म्रुत पावल्याची घटना नुकतीच घडलेली आहे मानवाचे निसर्गावर होत असलेले अतिक्रमण भविष्यात जगंली श्‍वापद व मानव लढाई सुरू झाल्याची नांदी पर्यावरण तन्य वारंवार बोलुन दाखवत आहे जंगली श्‍वापदांना अधिवास क्षेत्रात मुबलक प्रमाणात तु्र्णभक्षी पाणी प्राणी उपलब्ध झाले तरच माणवी वस्ती कडे होणारी जंगली प्राण्याची आगेकूच थांबणार आहे वन विभागाने या परिसरात पिंजरा लावुन बिबट्या चा बंदोबस्त होण्या बरोबर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई चा योग्य मोबदला मिळण्याची मागणी उल्हास काळे यांनी वन विभागाकडे केली आहे.

COMMENTS