Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात मेंढपाळ कुटुंबावर बिबट्याचा हल्ला  

धुळे : देऊर खुर्द (ता. धुळे) शिवारात बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला चढवत सहा महिन्यांच्या बालिकेस जखमी केले. बालिकेच्या अंगात स्वेटर असल्य

केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

धुळे : देऊर खुर्द (ता. धुळे) शिवारात बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला चढवत सहा महिन्यांच्या बालिकेस जखमी केले. बालिकेच्या अंगात स्वेटर असल्यामुळे बालिका बचावली आहे. या हल्ल्यात बालिकेच्या हाताला गंभीर जखम झाली असून बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  धुळे जिल्ह्यातील देऊर खुर्द शिवारात शरद पोपट देवरे यांच्या शेतात रामपुरा (ता. बागलाण) येथील भगवान झुलाल हळनर यांचा मेंढ्यांचा वाडा मुक्कामी आहे. दरम्यान 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढविला.

COMMENTS