Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने माण तालुक्यात फळबागांचे करोडोचे नुकसान

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी वादीळवार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-मलवडी परिसरात रात

ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
बळीराजा शेतकरी संघटनेचे कराडमध्ये धरणे आंदोलन

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी वादीळवार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-मलवडी परिसरात रात्री 10 घ्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली. देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा रात्रीच्या चक्रीवादळात भुईसपाट झाली. कृष्णराव बाबर यांची आंबा बागेत कालच व्यापारी येऊन गेले होते. 140 रु. दराने संपूर्ण बागे ठरविण्यात आली होती. 8 ते 10 दिवसांत बाग उतरायची होती. अंदाजे 12 ते 13 टन माल अपेक्षित होता. कृष्णराव बाबर यांचे 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी दिवसभर पाऊसाचे वातावरण दिसत होते. त्यातच सूरुवातीला रात्री 10 वा. चक्रीवादळाला सुरूवात झाली. बघता बघता विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे या परिसरातील आंबा, द्राक्ष, नारळ बांगासह दोडका, कारले, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा व अवकाळी पावसाच्या दणक्याने आंबा, द्राक्ष, नारळ बागायतदार पुर्णपणे उध्दवस्त झाले आहेत. या अवकाळी पावसाचा फटका बसला असून अनेक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्ष, नारळ पिकांचे नुकसान झाल्याची कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.
अजून दोन दिवस अवकाळी पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. अशा अवकाळी पावसाने आंबा द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील दोन चार दिवसांत पावसाची वाढ अपेक्षित आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे
कर्जमाफीच्या आनंदावर पाणी
सध्या राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच रविवारी देवापूर, पळसावडे भागात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली होत आहे. या भागांत अवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली फळ, पिके तर हिरावली. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

COMMENTS