कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांनी कोरोनाचाच उपचार करावा : शेखर सिंह

Homeमहाराष्ट्रसातारा

कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांनी कोरोनाचाच उपचार करावा : शेखर सिंह

सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे.

फेसबुक लाईव्ह करत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | LOKNews24
… म्हणून मिरच्या, लिंबू बांधायला सांगेन- अशोक चव्हाण
सेवानिवृत्त मुख्याध्यापक लावरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मात्र लक्षणं असूनही इतर उपचार करतात पर्यायाने रुग्णाचा संसर्ग वाढतो आणि रुग्णास धोका पोहचतो, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे खाजगी डॉक्टरांनी कोविड उपचार करावेत, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. रुग्णांमध्ये कोविड लक्षणे दिसत असल्यास अशा रुग्णांना खासगी डॉक्टरांनी प्रथम कोरोना टेस्ट करण्याबाबत सक्तीने सांगावे त्यांनतरच योग्य ते उपचार करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. खासगी डॉक्टरांकडे कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण आल्यास त्याच्यावर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत अथवा शासकीय रुग्णालयाकडे पाठवावे. असे न केल्यास जिल्हा प्रशासनाकडून अशा खासगी डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे सातारा जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचेही शेखर सिंह यांनी बैठकीत सांगितले.

COMMENTS