Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ वर्षाच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोघांना अटक

आरोपींना 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : जागतिक महिला दिन साजरा होत असताना श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका 9 वर्षाच्या मुलीवर नात्यातील एकाने आपल्या मित्रांसह

घोसाळकर हत्येप्रकरणात दोघांना अटक
अल्पवयीन युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक
विवस्त्र करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : जागतिक महिला दिन साजरा होत असताना श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका 9 वर्षाच्या मुलीवर नात्यातील एकाने आपल्या मित्रांसह आळीपाळीने अत्याचार करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते पसरविण्याची धमकी देत पीडित मुलीवर दोघांनी सुमारे एक महिनाभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार श्रीगोंदा परिसरातील दक्षिणेकडील एका गावात नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातील एका तरुणाने आमिष दाखवत त्याच्या आजोबाच्या घरी घेऊन जात तिच्यावर मित्राच्या सोबतीने संगनमताने जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच या घटनेचे मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर मागील एक महिन्यापासून दोघेजण संगनमताने अत्याचार करत होते. घडलेल्या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मुलीवर महिनाभर सामूहिक अत्याचार करणार्‍या दोघांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदु शेंडगे यांच्यावर पोक्सो अ‍ॅट्रॉसिटीसह सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील मुलीच्या नात्यातील तरुणाला तात्काळ अटक केली, तर दुसरा आरोपी गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या मार्गावर असतांना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केले.  सगळीकडे महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान होत असताना. या धक्का दायक घटनेने श्रीगोंदा परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS