Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोसाळकर हत्येप्रकरणात दोघांना अटक

मुंबईमध्ये राजकीय गँगवारचे तीव्र पडसाद

मुंबई ः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे  तीव्र पडसाद शुक्रवारी राज्यभरा

नऊ वर्षाच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोघांना अटक
अल्पवयीन युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक
विवस्त्र करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई ः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे  तीव्र पडसाद शुक्रवारी राज्यभरात उमटतांना दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी, यानिमित्ताने राजकारणातील गँगवार वाढल्याच्या प्रतिक्रिया उमटतांना दिसून येत आहे.
सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर वर 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर नोरोन्हा याने देखील स्वत:वर गोळ्या झाडून आपले जीवन संपवले. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच 1 पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता ताब्यात घेतलेल्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत.या दोघांकडून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री यासंबधीची चर्चा केली आहे. तसेच या घटनेमागचे नेमके कारण काय याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. नेमके प्रकरण कोणत्या वादातून घडले याची माहिती घेतली घेतली असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

गाडीखाली श्‍वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील ः फडणवीस- अभिषेक घोसाळकर यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे. एका तरुण नेत्याचे अशा पद्धतीने निधन व्हावे हे दुर्दैवी आणि गंभीर आहे. मात्र, या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच राजीनामा मागणार्‍यांनाही त्यांनी सुनावत म्हटले आहे की, एखाद्या गाडीखाली श्‍वान आला तरी, ते माझा राजीनामा मागतील.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ः नाना पटोले – महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

COMMENTS