मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे फडणवीस यांची टीका; शरद पवारांवरही निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे फडणवीस यांची टीका; शरद पवारांवरही निशाणा

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हे अपेक्षित होते.

ईडीच्या पथकावर हल्ला करणार्‍या नेत्याला अटक
नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले | LOKNews24
माहेश्वरी क्रिकेट प्रीमियम लीग यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई / प्रतिनिधीः उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हे अपेक्षित होते. इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या. कधी नव्हे, अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत लागले; पण राज्याचे मुख्यमंत्री यासंदर्भात चकार शब्दही का बोलत नाहीत. अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांची शेवटची प्रतिक्रिया वाझे काय लादेन आहे का, अशी होती, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या. तो लादेन की दाऊद आहे मला माहीत नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतरही मुख्यमंत्री का बोलत नाही, असा माझा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी चूक झाली, तर आम्ही तू सुधारू, असे जनतेला सांगितले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. देशमुखांचा राजीनामा देण्याकरिता उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि पवार यांनीघ्यायला हवा होता; परंतु त्याकरिता उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजेत, पण तशा पद्धतीने आलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.  नैतिकता कधीही आठवली तर त्याचे स्वागत केले पाहिजे. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का, असा प्रश्‍नच मुख्यमंत्र्यांना विचारावा लागेल. मी पुराव्यांच्या आधारे माझी भूमिका मांडत होतो; पण मला उत्तर देणारे टोलवाटोलवी करत होते. मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू, अशा वल्गना देत होते. पुराव्यांनिशी मी ज्या गोष्टी मांडत होतो ते आता न्यायालयानेही त्या स्वीकारल्याचे मला समाधान आहे. सचिन वाझेंचे बॉस अजून सापडलेले नाहीत. त्याचा हँडलर शोधणे गरजेचं आहे, असे फडणवीस म्हणाले.

COMMENTS