Homeताज्या बातम्या

बारा बलुतेदारांना बाजारपेठेत जागा द्यावी : राहुल गांधी यांच्याकडे नंदकुमार कुंभार यांची मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : बारा बलुतेदार, अठरापगड जातीतील लोकांचे सामाजिक प्रश्‍न सोडवणे गरजेचे आहे. बारा बलुतेदारांना बाजारपेठेत माल विक्रीसाठी ज

पंतप्रधान मोदींची 7 मे रोजी अहमदनगरमध्ये सभा
लोकांचे कैवारी बनणाऱ्यांची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू ; खासदार डॉ. सुजय विखे
‘न्यू आर्ट्स’मध्ये मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबीर 

इस्लामपूर / प्रतिनिधी : बारा बलुतेदार, अठरापगड जातीतील लोकांचे सामाजिक प्रश्‍न सोडवणे गरजेचे आहे. बारा बलुतेदारांना बाजारपेठेत माल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. कुंभार समाजातील लोकांना मातीवरील रॉयल्टी माफ असून सुध्दा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कुंभार समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली.
भारत जोडो या राहूल गांधीच्या हिंगोली येथील यात्रेत वाळवा तालुका आणि इस्लामपूर येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी सहभागी झाले होते. या यात्रेचे माजी मंत्री विश्‍वजीत कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, आ. विक्रम सावंत यांनी नियोजन केले होते. यासाठी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील साखराळेकर, शाकीर तांबोळी, बालम मोमीन, धनंजय कुलकर्णी, विजय पवार, उदय थोरात, अमित कुरळे, माजी प. स. आनंदराव पाटील, दिनकरराव पाटील, सुहास पाटील, सलमान आवटी, संपतराव पाटील यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी सांगितले.

COMMENTS