Homeताज्या बातम्या

बीड शहरातील मूलभूत सुविधांवर ‘तुतारी गट’ आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

बीड : बीड शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर आणि मूलभूत सुविधांच्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (तुतारी गट) चांगलाच आक्रमक

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
अमन व्हॉलीबॉल अकॅडमी बीड येथे खेळाडूंचा सत्कार समारंभ; राज्यस्तरीय विजेत्यांचा विशेष गौरव
पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करानगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची  निदर्शने-डॉ.गणेश ढवळे

बीड : बीड शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर आणि मूलभूत सुविधांच्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (तुतारी गट) चांगलाच आक्रमक झाला आहे. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे तसेच विविध नागरी सेवांबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गटनेते खुर्शीद आलम यांनी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

आज मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात तुतारी गटातील नगरसेवकांची आढावा बैठक पार पडली. पावसाळा सुरू झाला असतानाही बीड शहरात मोठ्या नाल्यांची व गटारांची योग्य प्रकारे सफाई झालेली नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. यामुळे शहरात रोगराई पसरण्याचा धोका वाढल्याचे निदर्शनास आणून देत तातडीने पावसाळ्यापूर्व स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय नियमित पाणीपुरवठा करणे, बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि स्मशानभूमी व कब्रस्तान परिसरात हायमास्ट दिवे बसवण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संस्कार शाळेसमोरील मंडई अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या प्रांगणात स्थलांतरित करावी, तसेच आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना यशवंत उद्यान मागील परिसर किंवा बिंदुसरा नदी पश्चिमेकडील रस्ता या पर्यायी जागा द्याव्यात, असे सुचविण्यात आले. यासोबतच अमृतजल योजनेची कामे पूर्ण होईपर्यंत नवीन कामांना वर्क ऑर्डर देऊ नये, कामगारांना वेळेवर नियुक्तीपत्रे व किमान वेतन लागू करावे आणि जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी दाखले नागरिकांना वेळेत मिळावेत, अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे गटनेते खुर्शीद आलम यांनी स्पष्ट केले. या बैठकीस नगरसेवक भारत कांबळे, अय्युब खान, शेख अथहर, अशोक काळे, शेख अफसर, किशोर पिंगळे यांच्यासह तुतारी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

COMMENTS