Homeताज्या बातम्याराजकारण

नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, त्याआधीच महायुतीत जागावाटपाव

विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
निवडणूक आली की आमदार हेमंत पाटील व आमदार चिखलीकर विसंवादी सुर का लावतात?महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचा, इतर निवडणुकात मात्र विरोध का?
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?



राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, त्याआधीच महायुतीत जागावाटपावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या जागावाटपात नांदेड विधान परिषद मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे नांदेडच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या सूत्रांनुसार, 17 पैकी 10 जागांवर भाजप निवडणूक लढवणार असून, शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 4 तर अजित पवार गटाकडे 3 जागा जाणार आहेत. यामध्ये नांदेडची जागा भाजपाकडे कायम ठेवण्यात आल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून, युवा नेते आशुतोष राजूरकर यांचीदेखील दावेदारी मजबूत मानली जात आहे. राजूरकर कुटुंबातील कोणीही उमेदवार राहिला तरी त्यांच्या पाठीमागे भाजपाचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांची भरभक्कम ताकद असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक ही केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे, तर संघटनात्मक ताकद, संपर्क आणि आर्थिक क्षमता यांवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे सक्षम आणि प्रभावी उमेदवार निवडण्यावर भाजप नेतृत्वाचा भर असल्याचे समजते. राजकीय जाणकारांच्या मते, भाजपाकडे सध्या विजय मिळवून देऊ शकेल असा मजबूत पर्याय म्हणून राजूरकर परिवाराकडेच पाहिले जात आहे. विशेषतः माजी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय भूमिकेला आणि मतदारसंघातील प्रभावाला या निवडणुकीत मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेताना त्यांचा शब्द निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप सक्षम उमेदवार देणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी होण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ उपलब्ध असल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. दुसरीकडे, महाविकास आघाडीसमोर मात्र उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. संख्याबळ असले तरी प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराचा अभाव विरोधकांना अडचणीत आणू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे नांदेड विधानपरिषद निवडणुकीत सध्या तरी भाजपाचे पारडे जड दिसून येत आहे.

COMMENTS