Homeताज्या बातम्या

30 वर्षांनंतर बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील व माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही

राज्यात सीएसआर निधीच्या वाटपात प्रादेशिक असमतोलतब्बल 8 हजार 630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत
मुख्यालयी वास्तव्याचे प्रमाणपत्र पुरेसे की प्रत्यक्ष पडताळणी आवश्यकमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीही लक्ष घालण्याची नागरिकांची मागणीग्रामसेवकांनी गावात राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत = बिडीओ पी. एन. वानखडे
कोळपेवाडीत पॉवर ट्रान्सफार्मर वेळेत दाखलआ. काळेंची कार्यतत्परता ; वीजपुरवठा पुन्हा सुरळीत


नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने बरबडा व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बससेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील तसेच नायगावचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून परिवहन विभागाकडे मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने अनेक वर्षांपासूनची नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. या बससेवेचा लाभ बरबडा, पाटोदा, कहाळा, कुष्णूर, घुंगराळा, नायगाव आणि नरसी परिसरातील शेकडो विद्यार्थी, शासकीय व खासगी कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालयांची कामे आणि दैनंदिन प्रवासासाठी ही बस अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बसचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 6.15 वाजता बस बरबडा येथून सुटून 7.30 वाजता बिलोली येथे पोहोचेल. तर सायंकाळी 6.15 वाजता बिलोली येथून सुटून 7.30 वाजता बरबडा येथे मुक्कामी पोहोचणार आहे. बससेवा सुरू होण्याच्या निमित्ताने आज सकाळी बसचे चालक व वाहक यांचा वसंत सुगावे यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बसला शुभेच्छा देत प्रवाशांसह मार्गस्थ करण्यात आले. यावेळी लक्ष्मण कोम्पलवाड, भास्करराव धर्माधिकारी, रामकिशन तीपलवाड, नागण सुरेवाड, बाबू रुद्रवाड, दिगंबर भुसालवाड, महाजन अंबुलगे, माधव शेवाळे, वायद शेख, महेबूब शेख, गंगाधर शिंगेवाड, प्रकाश गिरे, आनंदा पोटानवार, आनंदा रेजितवाड, मालकाजी घोसलवाड, यशवंत मदेवाड, प्रल्हाद जेटेवाड, उत्तम जेटेवाड, बालाजी शेवाळे, किरण हणमंते, अंकुश हणमंते, भगवान शेवाळे, दिगंबर जेटेवाड, लिंगोजी वाटपलवाड, व्यंकटी आलमवाड, पोचिराम धुमाळे, गोविंद धर्माधिकारी, शंकर कोम्पलवाड, माधव इंद्रवाड, बाबू मदेवाड, बाबू जेंगिलवाड, विक्रम मदेवाड, पांडुरंग जेटेवाड, शिवणा पुरमवाड, शिवाजी थेटे, व्यंकटी थेटे, बालाजी मेंकुदळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
30 वर्षांची प्रतीक्षा संपली!
बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नागरिकांना आरोग्य सेवा व शासकीय कामांसाठी, तसेच नोकरदारांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने ही बससेवा महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

COMMENTS