Homeताज्या बातम्या

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; वाचन-लेखन व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

नेकनूर : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑ

केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघातभवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन

नेकनूर : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त वाचन-लेखन उपक्रम तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढास डी. के. हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देशमुख आर. के. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुजावर एस. टी. यांनी केले. त्यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांनी जतन करून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि साहित्यप्रेम जोपासण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. देशमुख आर. के. आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा मंत्र देऊन देशात स्वातंत्र्याची चेतना जागवली, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून वंचित, शोषित समाजाच्या वेदनांना प्रभावी शब्द दिले. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्ये जोपासणे ही काळाची गरज आहे. वाचनाची सवय हीच व्यक्तिमत्त्व विकासाची खरी गुरुकिल्ली आहे.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. ढास डी. के. म्हणाले, महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात ठेवणे पुरेसे नाही, तर ते आपल्या आचरणात उतरविणे आवश्यक आहे. वाचन, चिंतन आणि समाजहिताची भावना यांमधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि राष्ट्रीय मूल्यांची रुजवण होते.

यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत सुमारे एक ते दीड तास विविध साहित्यकृतींचे वाचन केले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. इनकर विक्रम यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रामरुले दत्ता यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS