HomeUncategorized

तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

तामकणे : नाथ मंदीराच्या कळसाचे सुरू असलेले काम. (छाया : संजय कांबळे) पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केरा पंचक्रोशीतील तामकणे येथील जागृत ग्रा

शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : विक्रम वाघमोडे
तांबवेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सलग तिसर्‍या वर्षी विक्रमी रक्तदान
दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केरा पंचक्रोशीतील तामकणे येथील जागृत ग्रामदैवत श्री नाथ देवाच्या मंदीराच्या कळसाचे तसेच सुशोभीकरणाचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले असून कामास सुरुवात केली आहे. या कामासाठी मोठा खर्च होणार आहे .तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी, स्वयंसेवी संस्था आणि मंडळ, भाविक भक्तांनी तसेच माहेरवाशिनींनी सढळ हस्ते मदत करावी, अशी विनंती तामकणे ग्रामस्थांनी केली आहे. आधिक माहितीसाठी नवनाथ शिंदे, शिंदे वॉच कंपनी झेंडा चौक पाटण. तसेच सरपंच राम शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS