Homeताज्या बातम्या

आदिवासी दिन म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडविणारा सोहळा :आ. लहामटे

अकोले : निसर्गाला देवता मानून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची आदिवासी समाजाची परंपरा असून, ही संस्कृती आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

इराणवर अमेरिकेचे अकराव्या दिवशीही हल्ले सुरूच; लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांवर जोरदार कारवाई
बेल्ट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव; सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अकॅडमीचा उपक्रम
किनवट-माहूरच्या उंबरठ्यावर न्यायाची नवी पहाट: जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला प्रशासकीय मोहोर

अकोले : निसर्गाला देवता मानून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची आदिवासी समाजाची परंपरा असून, ही संस्कृती आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जागतिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सोहळा म्हणून आदिवासी दिनाकडे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.

पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. लहामटे बोलत होते. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आमदार लहामटे म्हणाले, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकर, लक्ष्या ठाकर यांसारख्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या लढ्यात बहुजन समाजाचीही साथ होती. त्यामुळे आदिवासी दिन हा केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित नसून, एकात्मतेचा संदेश देणारा दिवस आहे.

यावेळी राघोजी भांगरे व राया ठाकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांसह पारंपरिक वेशभूषा सादर केली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. या माध्यमातून आदिवासी संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य सुनील धुमाळ, रामदास कासार, अनिल चासकर, अण्णासाहेब ढगे, विठ्ठल आभाळे, तुकाराम भोर, संकेत येलमामे, महेश खांडरे, संतोष वावळे, लक्ष्मण बोऱ्हाडे, योगेश बगाड, सुवर्णा धात्रक, निलिमा कानवडे तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी शिवाजी चासकर, रोहिदास लगड, वाळिबा लगड, रामभाऊ जाधव आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS