श्रीरामपूर : सार्वजनिक, सहकारी, महामंडळे, खाजगी क्षेत्रातील ईपीएस-95 योजनेतील निवृत्त कर्मचारी पेन्शनवाढीसाठी गेली दहा वर्षे लढा देत आहेत. तथापि

श्रीरामपूर : सार्वजनिक, सहकारी, महामंडळे, खाजगी क्षेत्रातील ईपीएस-95 योजनेतील निवृत्त कर्मचारी पेन्शनवाढीसाठी गेली दहा वर्षे लढा देत आहेत. तथापि शसनाकडून याबाबत आश्वासनापलीकडे काहिच पदरात पडलेले नाही. त्यामुळे यापुढे पेन्शनवाढीचा लढा रस्ता रोको, चक्का जाम अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून अधिक तीव्र केला जाईल असा इशारा राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कॅप्टन अशोक राऊत यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरील आंदोलना दरम्यान दिला.
नवी दिल्ली येथील जन्तरमंतर मैदानावर देशातील ईपीएस-95 योजनेतील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने सूतगिरण्या, बँका, दूध संघ, शेती महामंडळ, एस. टी. महामंडळ आदी संस्थामधील निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रतिमहा साडे सात हजार अधिक महागाई भत्ता याप्रमाणे निवृत्तीवेतन मिळावे या मागणीसाठी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक राऊत यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव वीरेंद्रसींग राजावत, समन्व्यक रमाकांत निरगूड, राज्य सचिव रमेश बहुगुणा, राजीव भटनागर, बी, एस. नारखेडे, एम. एन. आंबेकर, बी, एस. राणा, शोभाताई आरस, सरिता नारखेडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सुभाष पोखरकर, इंद्रजितसिंग राजपूत, संपतराव समिदर आदी सहभागी होते.
उपस्थितना संबोधित करताना खा. वाकचौरे म्हणाले की, पेन्शनर्सच्या लढ्याबाबत आणि मागणीसंदर्भात सुरवातीपासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. यापूढेही हिच भूमिका कायम ठेवून ह्या मागणीचा संसदेत तसेच मंत्रीस्तरावर पाठपुरावा केला जाईल.

COMMENTS