श्रीगोंदा : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सहभागाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.हा उपक्रम केंद्रस्तर विशेष शिक्षक भानुदास शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर आणि उपप्राचार्य बापूसाहेब दिघे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना भानुदास शिंदे म्हणाले, “वृक्ष हे मानवाचे खरे मित्र आहेत. शुद्ध हवा, सावली, फळे, फुले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे अमूल्य कार्य वृक्ष करतात. वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आजची गरज आहे. वृक्षारोपण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढीला दिलेली अमूल्य भेट आहे.”दिव्यांग विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. त्यांनी लावलेली ही रोपे भविष्यात मोठ्या वृक्षांचे रूप धारण करून समाजाला शुद्ध प्राणवायू, सावली आणि हिरवाई प्रदान करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण होण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही रुजविण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या दिव्यांग विभाग प्रमुख श्वेता दैवज्ञ, सतीश ओहोळ, अरुण रुपवते आणि अजयकुमार मरकड यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS