Homeताज्या बातम्या

प्रेम, विश्वासघात आणि थरकाप उडवणारा खून! जामनगरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत रचला मृत्यूचा कट; दोन वर्षे पती ‘ऑस्ट्रेलियात’ असल्याचे सांगून केली दिशाभूल

जामनगर: गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढण्यास

संगमनेरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात; डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप व दर्शन
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा; शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
Murder under Indian Penal Code: All you need to know about it

जामनगर: गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून थरारक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीला दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पाजल्यानंतर, त्याचा मृतदेह तब्बल १२ ते १५ फूट खोल खड्ड्यात पुरला. इतकेच नव्हे तर पती कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असल्याचे खोटे सांगून ती दोन वर्षे सासरच्यांची दिशाभूल करत होती. मात्र, दिराच्या एका प्रश्नाने अखेर दोन वर्षांनंतर हे रक्तरंजित सत्य बाहेर आणले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पृथ्वी हिचे निलेश मनसुखभाई कचेटिया याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात पती जिग्नेश अडथळा ठरत असल्याने पृथ्वी आणि तिच्या प्रियकराने त्याला संपवण्याचा कट रचला. दोघांनी मिळून जिग्नेशला दारूमध्ये सायनाइड मिसळून पाजले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात खोल खड्डा खणून त्यांनी मृतदेह तेथे गाडला.

“पती ऑस्ट्रेलियात आहे”… दोन वर्षे एकच खोटं

जिग्नेशच्या हत्येनंतर संशय येऊ नये म्हणून पृथ्वीने सासरच्या मंडळींसमोर पती कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला असून, तो काम करत असलेल्या कंपनीत मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असल्याचा बनाव रचला. तिच्या या सांगण्यावर विश्वास ठेवून कुटुंबीय दोन वर्षे जिग्नेशची वाट पाहत राहिले.

दिराच्या एका प्रश्नाने उलगडला खुनाचा थरार

या प्रकरणाला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा जिग्नेशचा भाऊ अशोक स्वतः ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी करू लागला. उसने वहिनी पृथ्वीकडे जिग्नेशच्या कंपनीचा पत्ता मागितला, जेणेकरून तो तिथे जाऊन त्याची भेट घेऊ शकेल. मात्र, पृथ्वी पत्ता देण्यास सतत टाळाटाळ करू लागली. यामुळे दिराचा संशय बळावला. अखेर त्याने तिला खडसावून पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या पृथ्वीचे अवसान गळाले आणि तिने दोन वर्षांपूर्वीच जिग्नेशची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली.

१५ फूट खोल पुरलेला सांगाडा बाहेर काढला

ही तर सिया, मुस्कानपेक्षाही डेंजर, नवरा ऑस्ट्रेलियात गेल्याचा दोन वर्ष बनाव, अखेर एका प्रश्नाने... 'दृश्यम'लाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री

आरोपीने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत दरेड परिसरातील कारखान्यात उत्खनन केले. सुमारे १२ ते १५ फूट खोल खड्ड्यातून जिग्नेशच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS