कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारणी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराध्यक्ष हफिज शेख यांनी जाहीर केली आहे. बुधवार दि ८ जुलै रोजी संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, तालुका सचिव प्रा. विजय कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या कोपरगाव शहर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात शहर उपाध्यक्ष म्हणून रवी वाघडकर, कार्याध्यक्ष म्हणून स्वप्नील कोपरे तर शहर संघटक म्हणून जेष्ठ पत्रकार संजय लाड यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व नूतन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर या प्रसंगी सर्व शहर नूतन पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटना वाढीसाठी प्रयत्न करत कोपरगाव शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत शहराचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे त्या सोबतच वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत संघटनेचा नावलौकिक वाढविणार असल्याचे सांगितले.

COMMENTS