Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात भरदिवसा दरोडा; महिलेवर ब्लेडने हल्ला ; नागरिकांमध्ये भीती

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे भरदिवसा घडलेल्या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. रविवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकत महिलेवर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बाबुराव हारदे यांच्या घरात काही अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील वस्तूंवर हात साफ करत असताना घरातील सुनेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी तिच्यावर ब्लेडने वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात राहुरी तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी पोलिस यंत्रणा सुस्त झाल्याचा आरोप करत तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि त्वरित गुन्हे उघडकीस आणणे, ही काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी पोलिस यंत्रणा सुस्त झाल्याचा आरोप करत तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे.

पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  
कोपरगावमधील शेतकऱ्यांना साडेनऊ कोटींची भरपाई 
सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक; सिंचन भवनात विविध प्रश्नांबाबत बैठक ; निधीची मागणी

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे भरदिवसा घडलेल्या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. रविवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकत महिलेवर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बाबुराव हारदे यांच्या घरात काही अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील वस्तूंवर हात साफ करत असताना घरातील सुनेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी तिच्यावर ब्लेडने वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अलीकडच्या काळात राहुरी तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी पोलिस यंत्रणा सुस्त झाल्याचा आरोप करत तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि त्वरित गुन्हे उघडकीस आणणे, ही काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी पोलिस यंत्रणा सुस्त झाल्याचा आरोप करत तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे.

COMMENTS