Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड पोलिसांनी केली 48 हजाराची अवैध दारु जप्त

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध दारु विक्रेत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला त्यांनी अवैध देशी-विदेशी दारुचा तब्बल 48 हजार रु

दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी
संजीवनीचे बुद्धीबळपटू जिल्ह्यात प्रथम
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 50 दिवसानंतर आंदोलन मागे

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध दारु विक्रेत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला त्यांनी अवैध देशी-विदेशी दारुचा तब्बल 48 हजार रुपये किमतीचा माल पकडून दोन जणांवर कारवाई केली आहे. शहरातील एका पेट्रोल पंपासमोरून देशी विदेशी दारूचे बॉक्स गोणी मधुन घेऊन जात असताना एकाजणास पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कारभारी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 12 मार्च रोजी 11.00 वाजेच्या सुमारास  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्या ठिकाणी पोहेकाँ संजय लोखंडे, पोना अजय साठे, पोकाँ सतिष दळवी यांच्या पथकाने सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड-बीड रोडने नवले पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा एक इसम स्कुटरवर गोणीमध्ये बॉक्स घेवून जात असताना दिसला त्याचे स्कुटरवरील बॉक्स तपासले असता त्याच्या जवळ देशी व विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. संभाजी रंगनाथ नरवडे वय 40 वर्ष स. सुपा ता. पाटोदा जि. बीड असे या आरोपीचे नाव आहे. असे सांगितले. 3840 रूपये किमतीच्या मॅगडॉल व्हिस्की नंबर 1 कंपनीच्या प्रत्येकी 180 मि.ली.च्याप्रत्येकी 160 रु. किमतीच्या 24 सिलबंद बाटल्या, 1308 रूपये किमतीच्या ब्रॅन्ड मास्टर होडका कंपनीच्या प्रत्येकी 180 मि.ली.  प्रत्येकी 218 रु. किंमतीच्या. दारुच्या 6 सिलबंद बाटल्या, 37000रूपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या  प्रत्येकी 90 मि.ली. च्या प्रत्येकी 35 रु. किंमतीच्या दारच्या 200 सिलबंद बाटल्या, 35,000/- रु.कि.ची अटोव्हा कंपनीची लाल रंगाची स्कुटर नं. एम एच 23 ए क्यू 1230 असलेली असा एकूण 48 हजार 148 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यानुसार फिर्यादी पोकाँ प्रविण कारभारी पालवे यांच्या फिर्यादीवरून संभाजी रंगनाथ नरवडे विरूद्ध महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65 (ई). (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान  पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे एक इसम  बुलेटवरून विना परवाना देशी विदेशी दारूची वाहतुक करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामखेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक रवाना करुन सदरची बुलेट मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर इसमास अडवुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एकुण 16040 /- रु. किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व 80,000 /- रु. किंमतीची बुलेट मोटारसायकल असा एकुण 96040 /- रु. मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. यानुसार पोकॉ. विजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन सदर इसम आरोपी – विनोद शहाजी इंगळे (वय 29) रा. हापटेवाडी ता. जामखेड याचे विरुध्द मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS